
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी, आणि ते बाजारात खरेदीच्या हक्कां बाबत सक्षम व्हावेत, यासाठी विविध संघटना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांना जागृती करून देण्याचा प्रयत्न करतात हा या दिनांमागील स्पष्ट हेतु आहे,
सध्या आपण ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला अनेक बरे-वाईट अनुभव येत आहेत ,आपण फसू नये म्हणून
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी सध्या डिजिटल युग आहे, ऑनलाइन मार्केटिंग करताना जाहिराती पासून सावधान राहावे ,आकर्षक जाहिरातींना बळी पडू नये, प्रत्येक वस्तूची वाॅरंटी आणि गॅरंटी तपासून घ्यावे,ब्रँड व विश्वासार्हता तपासून घ्या ,डबाबंद पदार्थ पारखून निरखून घ्यावेत, कालबाह्य झालेल्या कोणत्याही वस्तू घेऊ नयेत, आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीत उत्सव व एकता निर्माण व्हावी यासाठी जगभरात ग्राहकांचे हक्क आणि गरजा बद्दल जागरूकता वाढविण्याची आवश्यकता आहे.
जागतिक ग्राहक दिनाची प्रेरणा अमेरिकेचे मा,राष्ट्राध्यक्ष जॉन, एफ, केनेडी यांच्या कडून घेतली गेली. 15 मार्च 1962 रोजी घोषणा केली, त्यानंतर ग्राहक चळवळीने 1983 ही तारीख ठरविण्यात आली. तेव्हापासून 15 मार्च हा ग्राहक हक्क दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
ग्राहक कोणाला म्हणावे?
वस्तू व सेवांचा वापर करणा-या किंवा उपभोग घेणा-या व्यक्तीला ग्राहक म्हणतात.
भारतात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये पास करण्यात आला पण
त्याची खरोखर अंमलबजावणी १
जुलै १९८७ पासून करण्यात आली,
भारतात २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन तर १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो
जागो ग्राहक जागो म्हणून ग्राहका वरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी सुलभ आणि वेगवान यत्रंणा तयार करण्यात आली आहे, तसेच चांगले व परिपूर्ण संरक्षण देण्याचे कायद्याने हमी दिली आहे,
परंतु काही कंपन्या भेसळयुक्त वस्तूंची विक्री करताना दिसून येतात, एखाद्या वस्तू मध्ये दोष असला तरी सांगत नाहीत, सदोष पध्दतीने विक्री करून नफा कमावतात, सध्या तर या संधीचा फायदा घेऊन साठेबाजी करून काळा बाजार करत आहेत,आपल्या कडे शिल्लक वस्तू असल्या तरी नाहीत म्हणून सांगतात, आणि ग्राहकांना परतून लावतात व निश्चित केलेल्या कमाल विक्री किंमती पेक्षा जास्त दर आकारणी करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात,
आज सर्वत्र जाहिरातीचे युग आले आहे, कोणत्याही वस्तू विक्री करावयाचे असल्यास जाहिरात दिल्या शिवाय वस्तूंची विक्री होत नाही,
चौकाचौकात जाहिरातीचे फलक दिसून येतात, त्यावर आकर्षक सूट सांगितली जाते, व वस्तू विक्री केल्या जातात, पण नंतर काही दिवसांनी त्या वस्तूचा कलर जाणे,वस्तू खराब होणे, वस्तू जुनी देणे, अशा घटना घडतात.
म्हणूनच ग्राहकांनी आकर्षक जाहिरातीना भुलू नये कोणत्याही वस्तूची खात्री करूनच ती वस्तू खरेदी करावी .
ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अनेक अधिकार दिले आहेत. त्यात
१) सुरक्षितेचा अधिकार
२) माहिती मिळविण्याचा अधिकार
३) तक्रार निवारण करण्याचा अधिकार
४) तक्रार ऐकवणयाचा अधिकार
५) ग्राहक शिक्षणाचा अधिकार
६) स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार
७) निवड करण्याचा अधिकार
असे अनेक अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्याचा वापर ग्राहकांनी सद्सदविवेक बुद्धीने करावा. आणि आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तरच या अधिकाराचा फायदा आहे.
जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांनी वस्तू घेते वेळी खात्री करूनच खरेदी करावी, रीतसर पावती घेऊनच बील द्यावे .MRP पेक्षा जास्त पैसे देऊ नये, वस्तुची शुद्धता तपासावी,नगसंख्या प्रत्यक्ष मोजून घ्यावी, निकृष्ट दर्जाची उपकरणे, अवजारे घेऊ नयेत, जुनी असलेली वाहने खरेदी करू नये, किंमत न छापलेल्या वस्तू अजिबात घेऊ नये, कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणूनच ग्राहक संरक्षण कायद्याने
जिल्हा मंच, राज्य आयोग, आणि राष्ट्रीय आयोगाची निर्मिती केली आहे. म्हणून ग्राहकांनी सावध राहूनच व्यवहार केल्यास खरा जागतिक ग्राहक दिन साजरा होईल, ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत सदैव जागरूक असणाऱ्या सर्वांना जागतिक ग्राहक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
साहित्यिक : प्रा बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता. मुखेड