
दैनिक चालु वार्ता
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
वाडा तालुका.
*आम्ही राष्ट्रीय काॅग्रेस पक्षांचे कार्यकर्ते आहोत , कुठेही समस्या असली की ती सोडवण्यासाठी आम्ही जातो.*
*अनंता वनगा* *सचिव- पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटी.*
निवडणुका जवळ आल्या तरच सर्वसामान्य लोकांना सत्ताधारी व विविध पक्षांचे नेते,पदाधिकारी , कार्यकर्ते, यांचे दर्शन होते. पण याला अपवाद आहे एक सामाजिक,राजकीय, आदिवासीं समाजातील तळागाळातून वर आलेले वादळी पण शांत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे अनंता वनगा पालघर जिल्हा काँग्रेस सचिव. जेवढे पद मोठे तेवढेच तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचलेले. त्यांच्याच शब्दात त्यांनी सांगितलेले सत्य आजही आदिवासी बांधवांच्या विकासाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचल्या नाहीत आजही ते उपेक्षित आहेत. अशीच वाडा तालुक्यातील एका गावाची गोष्ट.
त्यांच्याच शब्दात…. त्यांनी सांगितली.
आम्ही वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत चिखले मधील अवचीत पाडा या १००%आदिवासी लोकसंख्या असलेल्या पाड्याची पाहणी केली, ग्रामपंचायत चिखले हे गाव जि. प. आबिटघर गटामध्ये येते. त्यातील हा दुर्लक्षित असलेला वीस ते पंचवीस घरांची वस्ती असलेला अवचित पाडा,
सदर गोळेघर ते अवचितपाडा तीन किलोमीटर अंतर असुन दिड किलोमीटर खडीकरण झालेले दिसण्यात आले .बाकी दिड किलोमीटर वनविभागाच्या जागेतून जंगल पायवाटेने बांधावरुन, शेतातुन जावे लागते,आज आम्ही संध्याकाळी स्वतः या पाड्याची पाहणी करणे साठी गेलो परंतू कामानिमित्त पाड्यातील लोक बाहेर जात असतात म्हणून लोकांची भेट झाली नाही परंतू एका वृद्ध व्यक्तीशी भेट झाली व त्यांनी अवचित पाड्यातील समस्या मांडल्या,विद्युत वितरणची वीज पोहचली परंतू पक्का रस्ता नाही पोहचला, त्यामुळे पावसाळ्यात आजारी रुग्ण डोली करूनच दवाखान्यात न्यावा लागतो,आत्ता शाळा सुरु झाल्यावर लहान मुलांना या दाट जंगलातून पाय वाटेने पाठवायलाही घाबरा वाटतोय, असे वृद्ध व्यक्ती व एक महीला म्हणत होती, पिण्याच्या पाण्याची समस्या, रेशन दुकान नाही, शाळा नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही , अश्या कितीतरी समस्याचा पाडा ते बोलत होते आणि आम्ही त्यांचे बोलणे ऐकत होतो व नंतर आम्हीच आमची ओळख काॅग्रेस पक्षांचा कार्यकर्ता आहे असे सांगून माझ नाव अनंता वनगा व माझ्या सोबत वकील किरण भोईर साहेब आहेत असे सांगितले ,तसेच या पाड्यातील लोकांची लवकरच मीटिंग घेवुन चर्चा करुन सर्वांना सोबत व विश्वासात घेवून पक्क्यां रस्त्यांसाठी, व इतर सोईसुविधा साठी स्वतः जातीने प्रयत्न करु असे सांगितले.
निवडणुकीची धामधूम संपली की नेते,कार्यकर्ते पदाधिकारी गायब होतात पण अनंता वनगा सारखे सामाजिक कार्य करणारे सेवक आजही आहेत आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण सामाजिक देणे लागतो आणि म्हणुन जेवढे शक्य होईल तेव्हढे सामाजिक कार्य करणार आहोत, करीत आहोत,मग समोरचा माणूस कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी आपण सामाजिक जबाबदारी पार पाडत राहणार त्याने भले आपल्या पक्षाला मतदान केले नाही तरी चालेल पण आदिवासी बांधवांच्या विकास होणे गरजेचे आहे.
अशी ठोस भूमिका कायम ठेवणारे अनंता वनगा यांचा सारखे विचार प्रत्येक राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केला तर पालघर जिल्हयातील आदिवासी बांधवांचा विकास व्हायला फार वेळ लागणार नाही.