
दैनिक चालु वार्ता
प्रतिनीधी
बालाजी देशमुख
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणी संदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या शरद शतम् आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ना धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामूळे आरोग्य मित्र महाराष्ट्रच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंदुलाल – बियाणी यांनी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.