
दैनिक चालु वार्ता
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
पुणे जिल्हा.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने महाराष्ट्र सरकार कडे शिक्षकांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण विनाशुल्क करावे अशी मागणी केली आहे.
शिक्षण विभागा कडून वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात येते ज्या शिक्षकांची सेवा बारा वर्षे झाली व ज्यांची चोवीस वर्ष झाली त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. पूर्वी हे प्रशिक्षण विनाशुल्क शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येत होते. पण या वर्षी मात्र शिक्षण विभागाने हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचे ठरवले असून या प्रशिक्षणासाठी रुपये 2000 प्रशिक्षण फी ठेवलेली आहे तसेच तसेच ज्या शाळांचे शालार्थ आयडी आहेत अशाच शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेता येईल अशी अट घातली आहे पण महाराष्ट्र राज्यात स्वयंशासित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत यांना अजूनही शालार्थ आयडी मिळालेले नाही त्या शाळातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना हे प्रशिक्षण सेवेची अट पूर्ण असतानाही करता येणार नाही हा एक प्रकारे शिक्षकांवर अन्यायच आहे म्हणून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे हे प्रशिक्षण शुल्क व शालार्थ आयडी ची अट रद्द करावी अशी जोरदार मागणी शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, व शिक्षण आयुक्त यांच्या कडे केली आहे. अशी माहिती महासंघाचे उपाअध्यक्ष प्रा. श्री.पूर्णपत्रे यांनी दिली.