
चंद्रपूर – प्रतिनिधी
प्रमोद खिरटकर
कोरपना तालुका हा औद्योगिक दृष्टीने प्रगत असा तालुका असून सद्यस्थितीत तालुक्यात माणिकगड सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट दालमिया सिमेंट अंबुजा सिमेंट असे नावलौकिकास आलेले सिमेंट कारखाने व त्या ठिकाणावर उत्पादित मालाची ने-आण करण्यासाठी अनेक वस्तू वाहक वाहनधारकांनी आपले स्वतःचे ट्रान्सपोर्ट स्थापन केलेले आहे यातच मागील दोन वर्षापासून ऑगी न ट्रान्सपोर्ट नावाच्या वाहतूक कंपनीच्या माध्यमातून सद्यस्थितीत त्यांच्याकडे असलेल्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यासाठी हजारो लिटर डिझेलची वाहतूक बिना परवाना वस्तू वाहक वाहनातून केली जात असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांना मिळाली असता ठाणेदाराने आपले सहकारी पोलीस अंमलदार सुनील मेश्राम संदीप अडकिने मुंडे यांच्यासमवेत अगीन ट्रान्सपोर्ट वरती छापा टाकला असता एका वस्तू वाहक वाहनातून मशीनच्या च्या सहाय्याने बी सी पी एल चा लोगो असलेल्या वाहनात डिझेलचा साठा केला जात होता चौकशी व छान बिन केल्यानंतर अगीन ट्रान्सपोर्ट कंपनीकडे प्रकारचे अधिकृत दस्ताऐवज वाहतूक परवानगी दिसून न आल्याने दोनही वाहनांना प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले असून,
ऑगीन ट्रान्सपोर्ट परिसरामध्ये बी सी पी एल पेट्रोलियमचे कॉल ऑन डिलिव्हरी व बी सी पी एल लोगो तसेच त्यामध्ये एक मिनी डिझेल 13 हजार लिटर क्षमता असलेले डिझेल टॅंकर मागील दोन महिन्यापासून आहे त्या अवस्थेत उभे असतानासुद्धा स्थानिक तालुका महसूल प्रशासनाचे यत्किंचितही लक्ष गेले नाही याशिवाय दीड ते दोन महिन्या अगोदर महसूल व पुरवठा प्रशासनाच्या माध्यमातून याच ठिकाणी छापा टाकला असता त्यांनी बायोडिझेल चा अहवाल 0 असा पाठविल्याची ही माहिती सुत्रा द्वारे मिळते शिवाय रात्री पडलेल्या छाप्या मध्ये खुद्द माननीय तहसीलदार महोदय पुरवठा अधिकारी मंडळ अधिकारी यांना पाचारण करून सबब छाप्याची रीतसर माहिती देण्यात आली असतानासुद्धा शिवाय संपूर्ण प्रकरण हे महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत येत असताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तक्रार वाहनधारक अथवा ट्रान्सपोर्ट धारक यांच्याविरोधात केली गेली नसल्याचेही समजते याचा अर्थ नेमका काय समजावा ज्वलनशील विस्फोटक द्रव्याचा एवढा मोठा काळा बाजार बाजार होत असताना काळाबाजार करणाऱ्या लोकांना अधिकारी यांना पाठीशी का घालत आहे याचीही चौकशी होणे तेवढेच महत्त्वाचे आहे या गोष्टीचा जाब विचारला असता सविधान तत्त्वानुसार रीतसर कायदेशीर कारवाईही केली जाईल अशाच प्रकारचे अनाकलनीय उत्तर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने मिळाल्यामुळे विस्फोटक द्रव्याचा काळाबाजार करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची प्रशासकीय भीती शिल्लक राहिली नाही का असा प्रश्न निर्माण होतो.
घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चांदूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नाईक तहसीलदार महेंद्र वाकले कर मंडळ अधिकारी चव्हाण पुरवठा अधिकारी माकोडे आपल्या सहकारी समवेत उपस्थित झाले साठवणूक करत असलेल्या डिझेलची परिक्षण चाचणी केल्यानंतर ब्राऊजिंग परवाने अनुसार परवानगी असलेले डिझेल म्हणजेच बायोडिझेल याचा अंशही त्या ठिकाणी आढळून आला नाही उलट सद्यस्थितीत इंधन म्हणून ज्या डिझेलचा वापर होतो त्यात डिझेलची साठवणूक राजरोसपणे करण्यात येत होती दोनही वाहनांच्या मालकाची चौकशी केली असता डी सी पी एल चे संकेत चिन्ह असलेले वाहन व वाहतूक करणारे वाहन हे एकाच मालकाची असल्याचे निदर्शनास आले अशाप्रकारची हेराफेरी मागील दोन वर्षापासून दिवसाला एक टॅंकर याप्रमाणे एका फेरीमध्ये सात हजार लिटर डिझेल या सबबीखाली महिन्या अंती लाखो लिटर डिझेलची वाहतूक तेही बिना परवानगीने वरोरा येथील एका डिझेल पंपाच्या माध्यमातून केली जात असल्याचे उघड झाले असून
रात्री उशीरा झालेल्या पोलीस प्रशासकीय कारवाई मध्ये तोवर बंडू श्रीहरी भोयर व सोपं वर्ष राहणार नंदुरी तालुका वरोरा देश दीपक मालू 31 वर्ष राहणार शिवाजी वार्ड वरोरा तालुका वरोरा यांच्याविरुद्ध कलम 3 सात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये तक्रारदार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांचेकडून दाखल करण्यात आला याशिवाय डी सी पी एल कंपनीचा सहा हजार लिटर क्षमतेचा असलेला टॅंकर क्रमांक एम एच34 bg 8145 त्याच सोबत पुरवठा करणारा टँकर क्रमांक एम एच 34bg6928 असे दोन्ही टॅंकर जप्त करण्यात आले आर वर सदर वाहनाचा नंबर तपासला असता जग यांच्या नावाचे वाहन रजिस्ट्रेशन असून त्याला बूट्स परमिट असल्याचे दिसून येते टँकर मध्ये उपलब्ध असलेला डिझेल साठा व दोन्ही वाहनांची किंमत कंदरी पंचवीस लाख बावीस हजाराचा मुद्देमाल जॉकी अवैद्य आहे तो जप्त करण्यात आला संपूर्ण घटनेचा पुढील सखोल तपास गडचंदुर उपविभागीय अधिकारी सुधीर नाईक यांच्या नेतृत्वात गडचांदूर चे थानेदार सत्यजित आमले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आवड पुर पोलीस चौकीचे अंमलदार सुनील मेश्राम संदीप आडकिने व इतर सहकारी करीत आहे.
*तालुका प्रशासनाची पोलिसात तक्रार देण्यास टाळटाळ*
तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने मागील एक दीड महिन्यापूर्वी टाकण्यात आलेल्य चौकशीचा जिल्हा प्रशासनाला पाठविलेला अहवाल व प्रत्यक्षात काल रात्री ला झालेली कारवाई बद्दल पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यास केली टाळाटाळ या सर्व गोष्टी एका विशिष्ट दिशेला उंगली निर्देश करीत असल्यामुळे तालुका प्रशासनाने पोलिस प्रशासनाला तक्रार का दिली नाही? बायोडिझेलच्या नावाखाली सदर कंपनीच्या माध्यमातून अतिशीघ्र ज्वलनशील विस्फोटक द्रव्याची वरोरा येथील मालू डिझेल पंपाच्या माध्यमातून वाहतूक राजरोसपणे कशी काय केली जाते? ऐंशी ते शंभर किलोमीटरचा प्रवास करीत असताना शिवाय जिल्ह्याच्या सीमा ओलांडून जात असताना रस्ते पोलीस प्रशासनाच्या ध्यानात ही बाब का येत नाही असे आणि अनेक असंख्य प्रश्न आता निर्माण व्हायला लागले आहे.