
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेली
शेतक-यांची थकबाकी वसुली मोहिम अंतर्गत पाणी पुरवठा व शेती पंपाची विज बिल वसुली व
विज तोडणी अभियाना अंतर्गत हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची विज तोडणी
चालू आहे माजी आमदार नागेश पाटील यांनी असे म्हटले की आधीक वर्षाची धक बाकी असल्यास विज तोडण्यात येऊ नये. कारण की, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अतिवृष्टी ही नांदेड जिल्ह्यात झालेली असून त्यात सर्वाधिक अतिवृष्टी व पुर परिस्थिती माझ्या हदगांव-हिमायतनगर मतदार संघात जास्त झाली असून अतिवृष्टीने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्या बाबतीत माजी आमदार मा. नागेश पाटील आष्टीकर यांनी मा. मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन नुकसान भरपाईसाठी विनंती केलेली आहे व मा.ना. नितीन राऊत साहेब उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढे शेतकऱ्यांच्यी व्यथा मांडतांना म्हणाले की शेतकरी वर्गास कोणत्याही प्रकारचे उत्पन्न झालेले नसून त्यामुळे त्यांना विज बिल भरणा शक्य नसल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, ऊस या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आपल्या विभागा तर्फ होत असलेली चालू वर्षाची सक्तीची विज बिल वसुली व विज तोडणी त्वरीत थांबविण्यात यावी व शेतक-यांस आपल्या विभागा तफै एकुण बिलाच्या २५ टक्के रक्कम भरण्याची शेतकऱ्यांची तयारी असून तशी सवलत देण्यात यावी असे विनंती पत्र माजी आमदार नागेश पाटील आष्टी कर यांनी मा. ना. नितीन राऊत साहेब उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती पत्र दिले.