
दै.चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- दुबई येथे आयोजित एक्स्पो 2020 मधील भारताच्या शामियान्यात शुक्रवार, 26 नोव्हेंबर, 2021 पासून सुरू होत असलेल्या वस्त्रोद्योग सप्ताहा दरम्यान भारत जागतिक वस्त्रोद्योगासाठी पसंतीचा उत्पादक भागीदार बनण्यासाठी प्रयत्न करेल.वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री, श्रीमती. दर्शना व्ही जरदोश ‘वस्त्रोद्योग सप्ताहा’चे आभासी माध्यमातून उद्घाटन करतील. आगामी वस्त्रोद्योग सप्ताहाविषयी बोलतांना (२६ नोव्हें-२ डिसेंबर), श्रीमती. जरदोश म्हणाल्या की, “भारतीय वस्त्रोद्योग हा जगप्रसिद्ध आहे कारण तो केवळ देशाच्या तेजस्वी भूतकाळाचे प्रतिनिधित्व करत नाही तर आधुनिक काळाच्या गरजांशी सुसंगत आहे.भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्र आणि तयार वस्त्र निर्यात करणारा देश आहे आणि भारताने जागतिक उत्पादन केंद्र बनण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले असून जागतिक गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी अपार संधीचे भारत प्रतिनिधित्व करतो .”