
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
. यंदाचा उत्क्रष्ठ प्रशासकीय अधिकारी हा मानाचा पुरस्कार मा. श्री के. एम. मल्लीकार्जून प्रसन्ना विशेष पोलीस महानिरीक्षक(DIG) औरंगाबाद* यांना देण्यात आला. शिवा संघटनेच्या दिलेल्या निमंत्रणावर कपिलधारला तीन जिल्हयांच्या सिमा ओलांडून करून फक्त *शिवा संघटनेच्या मेळाव्याच्या कार्यक्रमास मा.DIG साहेब प्रा. धोंडे सरांच्या शब्दासाठी दि. 18/11/2021 रोजी कपिलधार ला येऊन त्यांनी श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचे दर्शन घेतले आणि शिवा संघटनेच्या पदाधिकारी यांचा संपर्क न झाल्याने साहेब पुरस्कार न घेता केवळ दर्शन घेऊन परत औरंगाबाद ला गेले. त्यामुळे आज प्रा. धोंडे सरांच्या आदेशाने आणि शिवा संघटनेच्या औरंगाबाद जिल्हयाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी मा. DIG साहेब, परिमंडळ औरंगाबाद यांना त्यांच्या ऑफीस मध्ये जाऊन मानाचा शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.* यावेळी *शिवा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक फुलशंकर,शेवडीचे सरपंच बसवेश्वर धोंडे,शिवा संघटनेचे शहरप्रमुख उमेश दारूवाले,अशोकराव जाधव, माजी शहरप्रमुख वीरभद्र वनशेट्टे,उप शहरप्रमुख गजानन स्वामी, विरभद्र चिपडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.