दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि.21 (वार्ताहर) –
मुखेड येथील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक श्रीमती कौशल्याबाई किशनराव पाटील बेटमोगरेकर (वय 84 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दि. 21 रोजी नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर बेटमोगरा ता. मुखेड येथे बुधवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.
मुखेड अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष कै.ॲड. किशनराव पाटील बेटमोगरेकर यांच्या त्या पत्नी होत.
माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,
माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,
माजी सभापती ॲड. बळवंत पाटील बेटमोगरेकर
यांच्या काकु होते.
ॲड.सौ.कल्पनाताई डोंगळीकर यांच्या मातोश्री होते. या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.