
दैनिक चालू वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी प्रा अंगद कांबळे
म्हसळा – मेंदडी बिटातील चिखलप केंद्राची शिक्षण परिषद दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत केंद्राचे केंद्र प्रमुख प्रकाश मांडवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी शिक्षण परिक्षेदेत प्रास्ताविक, गुणवत्ता विकास, गणित आणि मराठी पेटीवर मार्गदर्शन व चर्चा आणि प्रशासकीय विषयावर चर्चा.
यावेळी म्हसळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे कौचाली जनाब सर यांनी अध्ययन स्तर विषयी माहिती दिली. विद्यार्थी कोणत्या लेव्हल/ स्तर हे शोधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. नंदकुमार जाधव सर यांनी आॅनलाईन स्वाध्याय विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली., दिपक पाटील सर यांनी टिचर अॅक्टीव्हीटीय / शिक्षक प्रशिक्षण बाबत माहिती दिली.तसेच सध्या परिस्थिती विषयावर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. , अनिल बेडके सर यांनी विविध शैक्षणिक उपक्रम बाबत माहिती देऊन . विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांना आणि सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांची अध्ययन स्तर निश्चित करून पुढील शैक्षणिक मार्गदर्शन करून व पुढील गुणवत्ता विकास वाढीस १००% प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषद मध्ये नविन नविन उपक्रमावर भर देऊन सकारात्मक चर्चा झाली.
या शिक्षण परिषेदेत स्वागत आणि आभार मांडवकर सर यांनी केंद्राच्या वतीने केले. यावेळी चिखलप केंद्राच्या शिक्षकांनी सहभाग घेऊन उत्तमरित्या शिक्षण परिषद संपन्न झाली.