
दै.चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई:आज दि. २६/११/२०२१ भारतीय संविधान दिन, भारतीय संविधान दिनानिमित्त आज अंबाजोगाई येथील मानव विकास निवासी मतिमंद, मूकबधिर तसेच अपंग विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रतिला अभिवादन करुन संविधानाचे शपथपूर्वक वाचन करण्यात आले.
संविधानाचे वाचन मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. आनंद टाकळकर यांनी केले. मागोमाग सर्व स्टाफ ने संविधानाचे शपथपूर्वक वाचन केले. प्रसंगी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री. परमेश्वर चव्हाण, अपंग शाळेचे मुख्याध्यापक श्री. इंद्रकुमार लोढा, तसेच शिंदे सर, बडे सर, चव्हाण सर, साठे सर, घाडगे सर, कोंबडे सर, जोशी सर, बाबजे सर, कसबे सर, कुलकर्णी सर, नांदुरकर सर, शेख अखिल, श्रीमती पवार मॅडम उपस्थित होते.