
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि.27
सुरत न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणाम ध्ये दोषी ठरवत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटू लागले आहे. मुखेड तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, शहर काँग्रेस
समितीच्या वतीने देखील मुखेड येथे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
केल्याच्या विरोधात सोमवारी जोरदार घोषणाबाजी देत रास्तारोको जेलभरो आंदोलन करण्यात आले.
हिटलरशाही, हुकुम शाहीसारखे केंद्र सरकार विरोधी पक्षांना सापत्नची वागणूक देत आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात
आले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर आकसापोटी कारवाई करण्यात आली. त्यांची होत असलेली लोकप्रियता वाढता प्रतिसाद पाहुन केंद्र सरकार सर्व यंत्रणा हाताशी धरुन त्यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द करुन लोकशाहीचा खुन केला. अशा हुकुमशाही सरकारच्या निषेध अशी प्रतिक्रिया श्रावण रेपनवाड, राजू पाटील रावनगावकर, संतोष बोनलेवाड यानी यावेळी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात काही तास कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन केले. जवळपास ५० कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पोलिस प्रशासनाने अटक करून सुटका केली. दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तालुक्याचे गावाचे शेजारी हून मार्गक्रमण झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेबाबत नागरिक कमालीचे उत्सुक होते. राहुल गांधी यांच्या जवळून संबंध आल्याने होता
कार्यकर्त्यांसह काही नागरिकाने त्यांचे खासदारपद रद्द झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनात मुखेड तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणागावकर, प्रदेश सचिव डॉ श्रावण रेपनवाड, राजन देशपांडे, सुभाष पा. दापकेकर, नंदकुम र मडगुलवार, उत्तम अण्णा चौधरी, संतोष बोन्लेवाड, गणपतराव गायकवाड, डॉ रंजित काळे, आकाश पाटील उंद्रीकर, शिवाजी गेडेवाड, नागनाथ पाटील, सुनिल आरगिळे, सुरेश पा वेळीकर, दिनेश अप्पा आवडके, संदिप पा ईटग्याळकर, मोशिन कोतवाल, जयप्रकाश कानगुले, विशाल गायकवाड, संजय पा बोमनाळीकर, रामेश्वर इंगोले यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नहीं चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, अशाही घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्यने शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला