
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली दि. 28 तळेगाव – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून युवा सेनेच्या उपविभाग प्रमुख पदी श्री माऊली आबा वायदंडे यांची निवड करण्यात आली.
या वेळी बोलत असताना त्यांनी सांगितले की शेवट पर्यंत निष्ठेने उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहून प्रामाणिकपणे पक्ष संघटना बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार, तसेच सामान्य नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.
या वेळी उपतालुकाप्रमुख श्री राहुल शिंदे, विभाग प्रमुख भीमराव कुदळे, उपविभाग प्रमुख अनिल सातकर, शाखाप्रमुख गणेश शिवले, जिल्हा परिषद गट सल्लागार नानासाहेब वाघचौरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.