
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
लातूर:अहमदपुर: सुमठाणा येथील आदर्श पशुपालक अनेक पुरस्कार विजेते श्री चंद्रहास उर्फ पप्पु संभाजी हामणे यांचा शिर्डी येथे आयोजित केलेल्या महा एकसपो पशुधन मेळाव्यात प्रथम क्रमांक आल्या बद्दल त्यांना ट्रॉफी आणी सन्मान चिन्ह देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पप्पु हामने यांना लहानपणापासून असलेली गुरे,जनावरे पाळण्याची असलेली आवड त्यांना ह्या पुरस्कारापर्यंत घेऊन गेली .आपल्या आवडीला आपल्या व्यवसायात कस बदलावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पप्पु हामने .त्यांच्या कुटुंबाला व्यवसायिक पार्शवभूमी असताना त्यांनी त्याच्यात लक्ष न घालता पूर्ण महाराष्ट्र भर आदर्श पशु पालक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या जमातीच्या, म्ह्यशी, गायी ,त्यांच्या गोठ्यात दिसतात त्यांचं संगोपन व्यवस्तिथ करण्याकडे त्यांचा खूप कटाक्ष असतो.आजकालच्या युवा पिढीला पशु पाळण्याबद्दलची उदासीनता आहे पण या पप्पु हामने हे सर्व युवकासाठी पशुपालक म्हणून आदर्श नक्कीच आहेत. त्यांना मिळालेल्या सन्माना बद्दल त्यांचं सर्व तालुका आणी गावातून खूप कौतुक होत आहे.
चंद्रहास उर्फ पप्पु हामने यांनी आपल्या कार्यातून आपल्या गावाची महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली याचा आम्हाला अभिमान आहे.त्यांचा समाजिक,राजकीय लौकिक सर्व दूर आहेच पण आदर्श पशुपालक म्हणून त्यांनी निर्माण केलेली ओळख अभिमानास्पद आहे.त्यांच सर्व गावाकऱ्यांच्या वतीने अभिनंदन
समस्त गावकरी सुमठाणा