
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
प्रतिनिधी(श)आष्टी ते मोर्शी रोडवर आज सकाळी ११च्या सुमारास दुचाकी व ऑटोची धडक बसून अपघात झाला तर ३ दिवसापूर्वी याच परिसरात झालेल्या अपघातात २ इसम ठार झाले होते आज झालेल्या अपघातात आष्टी येथील रहिवासी संजय दारोकर (५२) यांचा जागेवरच मुत्यु झाला दुचाकीवर मागे बसलेल्या सौ दारोकर व ऑटो चालक जखमी झाला आष्टी येथून मृतक संजय दरोकार पत्नी सुलभा दारोकर (४५)ला घेऊन एम.एच.३२ए आर ३२१७ क्रमांकाच्या दुचाकीने पिलापूर येथील जागृत तेलाई माता मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्येक्रमाला जात असल्याची माहिती प्राप्त आहे तर,पिलापूर येथील ऑटो चालक हितेश लांडे(२५) हा आटो घेऊन आष्टीला जात असताना लहान आर्वी फाट्यालगत राममंदिरराच्या अगदी समोर अपघात झाला त्या मध्ये हितेश लांडे जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले सदर घटनेची माहिती दूरध्वनीवरून पो.पाटील देवानंद पाटील यांनी आष्टी पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी सहा.पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे,पो.उप.निरीक्षक आजिनाथ दौड,जमादार गजानन वडनेरकर, पो. हवालदार अमित जूवारे वाहतूक पोलीस शिपाई नंदकिशोर वाळवे यांनी घटनास्थळी हजेरी लावली पुढील पोलीस कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे