
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
पेठवडज :- दि. २६/११/२०२१ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज येथे संविधान दिनानिमित्ताने सामुहिक रित्या संविधान उद्देशिका चे वाचन करून व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रावसाहेब राजे माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग कंधारे पत्रकार गजानन जाधव, बाजीराव गायकवाड व शाळेचे मुख्याध्यापक श्री कारभारी सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.