
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
लोहा— सर्व शिक्षक व शिक्षण विभाग पंचायत समिती, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद, भंडारा यांचा कृतज्ञता गौरव सोहळा, निरोप समारंभ नुकताच विकी गार्डन मंगल कार्यालय लोहा येथे संपन्न झाला. रवींद्र सोनटक्के हे पंचायत समिती लोहा येथे गटशिक्षणाधिकारी पदावर तीन वर्षे कार्यरत होते. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता गौरव सोहळा अर्थात निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी( मा.) होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शरद मंडलिक उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी , व्यंकटेश मुंडे तहसीलदार, जयश्री आठवले प्राचार्य, डायट नांदेड, दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी, शैलेश वाव्हळे गटविकास अधिकारी, अशोक मोकले नायब तहसीलदार, राम बोरगावकर नायब तहसीलदार , प्रणव चेटलावार प्रकल्प अधिकारी ए.बा., चंद्रकांत धुमाळे, अधिव्याख्याता तथा लोहा संपर्क अधिकारी, सतीश व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी लोहा, एम.जी.मोरे गटशिक्षणाधिकारी कंधार, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी व्ही.जी.दवणे, एम.आर. राठोड, माजी गटशिक्षणाधिकारी सुधिर गुट्टे आदींची उपस्थिती होती. निरोप मूर्तींना शिक्षण विभाग व तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने जोड आहेर, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सोन्याची अंगठी, खारीक- खोबरे विशेष हार व पुष्पहार देऊन सपत्नीक, यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समन्वय समिती व सर्व शिक्षण विभाग लोहा यांनी परिश्रम घेतले.