
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
कळंब धाराशिव चे आ. कैलास दादा घाडगे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या, कळंब तालुका पत्रकार संघाच्या *पत्रकार भवन* चे उद्घाटन व स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव *पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवार 30 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आलेले आहे. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…खा.ओमराजे निंबाळकर, तर ए.बी.पी.चे समूह संपादक राजीव खांडेकर यांच्या शुभ हस्ते व आ. कैलास दादा घाडगे पाटील, राजकीय विश्लेषक अभय भैय्या देशपांडे, मा.नगर अध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे, प्रतिष्ठित व्यापारी बंडोपंत ( बापू) दशरथ, धनेश्वरी शिक्षण समूह चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रसेन( बाबा ) देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी निरफळ, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या वेळी स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार , आदर्श शेतकरी लिंबराज नाना चोंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.