
दैनिक चालू वार्ता
नांदेड जिल्हा उत्तर प्रतिनिधी
समर्थ दादा लोखंडे
आज दि.26 नोव्हेंबर रोजी कै.उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालय बहाद्दरपुरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री शिवाजी विधिमहाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.ऑ.प्रकाशराव डोंप्पले साहेब, श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी चे सचीव व माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडेसाहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पन करुन संविधानविषयी विचार मांडले. या प्रसंगी संविधानाचे सामुहीक वाचन करण्यात आले.या प्रसंगी उपसरपंच हनमंत पाटील पेठकर,भोळे गुरुजी,हनमंत सकरलवाड,दत्तत्रय धोंडगे गुरुजी,शेख शफी,मोहन शेकापुरे,शंकर आंबेकर ,शंकर खरात ,पत्रकार दाभाडे,भिमराव कदम,ग्रंथपाल संजय एमेकर,प्रदीप इंदुरकर.गावातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होता.