
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:-अहमदपूरच्या जिवाळ्याच्या प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे अहमदपूर मध्ये गेल्या किती वर्षापासून पाणी हे विकत घ्यावी लागते आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी सन 2008 व 2009 मध्ये माजी आ. बब्रुवान खंदाडे यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवन समोर उपोषणाला बसून नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून पाईपलाईन केली होती जी पाईपलाईन आज तगायत सुव्यवस्थेत होती नगरपरिषद प्रशासनाला ती पाईपलाईन ठेवून नवीन पाईपलाईन चालू ठेवता आली नाही असती मात्र अति घाई व व्यापक प्रसिद्धी न देता मॅनेज पद्धतीने पाईपलांची विक्री केली असल्याचा आरोप करत त्या पाईपलाईन ची किंमत त्यावेळी पाच कोटी अंदाज होती आता तीच पाईपलाईन करण्यासाठी अंदाजे २० कोटी रुपये लागतील ती पाईपलाईन केवळ 85 ते 86 लाख रुपये विक्री करून अहमदपूर नगर परिषदेचे दिवाळी निघालेले सिद्ध केले आहे दिनांक 26 /03/2023 रोजी माजी आ.बब्रुवान खंदाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली की पाईपलाईन विकली गेली असून ही पाईपलाईन विकण्या मागील कारण म्हणल तर नगर परिषदेचे लाईट बिलाची भरती करण्यासाठी तसेच ही पाईपलाईन जास्त काळ चालणार नव्हती तसेच पाईपलाईन बंद होती ऑडिट प्यारा होता हायवे मध्ये पाईपलाईन गेली आहे असे उत्तर नगरपरिषद प्रशासन सांगितले असे विकायची घाई होती तर थोडगा ते अहमदपूर किंवा नांदुरा ते अहमदपूर ही पाईपलाईन विकता आली असती तिचा वापर 2009 पासून पूर्ण बंद आहे किंमान नांदुरा येथील शेतकऱ्यांचे डोक्यावरती टांगती तलवार तर गेली असती जास्त काळ चालणारा नव्हती तर न.प. प्रशासन ठरवणार कोण त्याला हायर तांत्रिक अधिकारी उदाहरणात एम जे पी सी इ शासन किंवा तज्ञ अभीयंते ठरवू शकते असते ती पाईपलाईन पोकलेने खोदून फुटली नाही ही विशेष बाब आहे तसेच या वर्षाची लाईट बिल पाईपलाईन विकून भागिले पुढच्या वर्षी काय विकणार नगरपालिका तसेच पाईपलाईन बंद होती असे कारण सांगत आहेत पण हे खोटे आहे दोन महिन्यापूर्वीच्या पाईपलाईनने अहमदपूर मध्ये पाणीपुरवठा केले आहे पाईपलाईन बंद आहे म्हणजे बंद नसून नगरपरिषदेने चालू केली नव्हती बंद ठेवली होती ती नादुरुस्त किंवा तुटलेली नव्हती पुढे बोलताना खंदाडे यांनी सांगितले की न प्रशासनाने वादीसाठी हल्ल्या कापला असून तोही नगरपरिषद बॉडी अस्तित्वात नसताना अहमदपूर मधील इमर्जन्सी टाईम मध्ये काम करणारी होती ही पाईपला स्टॅन्ड बाय ठेवून ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी याचा वापर करता आला असता पण गरज नसताना केवळ पैशासाठी नगर परिषदेने भंगार मध्ये विक्री केली त्यामुळे याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले असून यातील दोषी लोकांवर प्रशासन कोणीती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे