
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर येथील उपक्रमशील शिक्षीका सौ संगीता चव्हाण ( कदम ) यांनी इयत्ता ६ , ७ , ८ , वर्गासाठी विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिपस्तंभ नावाचे हस्तलिखित पुस्तक तयार केले.
या पुस्तकामध्ये ज्ञान , मनोरंजन , वास्तव नवनिर्मिती, आकर्षक चित्रे , प्रयोग यादी , विज्ञानकोडी , गीत , विनोद , सुविचार , शायरी , असा अनमोल खजीना असुन , या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड , वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे , नवनिर्मितीसाठी बुध्दीला चालना देणे , विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे , परीसरात विज्ञान शोध घेणे , व विद्यार्थ्यांची बुध्दी संशोधन बनवने असा या पुस्तकामधील दृष्टीकोन आहे.
सौ संगीता चव्हाण ( कदम ) यांच्या दिपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन पार्डी येथे कृतज्ञता गौरव सोहळ्याच्या पुर्वी शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहेबांनी दिपस्तंभ पुस्तकाचे वाचुन बारकाईने निरीक्षण केले. व दिपस्तंभ पुस्तकाचे तोंडभरून कौतुक पण केले . व सौ संगीता चव्हाण ( कदम ) यांना शुभेच्छा पण दिल्या यावेळी श्री. प्रशांत दिग्रसकर(मा. शिक्षणाधिकारी जि.प.नांदेड),श्रीमती. जयश्री आठवले (प्राचार्य डायट नांदेड) श्री. चंद्रकांत धुमाळे(जेष्ठ अधिव्याख्याता, डायट तथा लोहा संपर्कप्रमुख),श्री. सतीश व्यवहारे(गटशिक्षणाधिकारी पं स.लोहा),श्री. फटाले साहेब(शि.वि.अ.बीट कापसी),श्रीमती. अंजली कापसे(शि.वि.अ.बीट सोनखेड),श्रीमती. सरस्वती आंबलवाड(शि.वि.अ.बीट सुनेगाव),श्री. बालाजी काळेवाड(मु.अ.जि.प.हा.पेनूर),श्री. नागोराव जाधव(कें.प्र.शेवडी बा.)श्री. नरेंद्र चव्हाण(मा.शि.कै.न.वि.लोहा),श्री.विश्वंभरराव मंगनाळे साहेब मा. कृषी अधिकारी लोहा, श्री. डी.आर.शिंदे(मु.अ.कन्या लोहा),श्री. काशिनाथ सिरसीकर(स.शि.सुनेगाव),श्री. एम आर सोने(मा.शि.जि.प.हा.पेनूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिपस्तंभ हस्तलिखित पुस्तकामुळे पेनुर येथील अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पडली असुन इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या सिध्दी गवतेची स्पर्धा परीक्षेतुन श्रीहरिकोटा सहलीसाठी जिल्हास्तरावरुन निवड झाली असुन परीसरात शाळेत पण सौ संगीता चव्हाण ( कदम ) यांच्या दिपस्तंभ हस्तलिखित पुस्तकाचे कौतुक केले जाते आहे.