
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे
मंठा नवीन आर्थिक वर्षात नवीन
व्यवहारांची सुरुवात होणार असल्याने तत्पूर्वी जुने हिशोब पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने बँका, पतसंस्थासह सोसायट्यांकडून कर्ज वसुलीसाठी नागरिकांकडे चकरा वाढल्या आहेत.
यासाठी संस्थांचे प्रतिनिधी कर्जदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेऊन थकीत रक्कम भरण्यासाठी भर देत nआहेत. त्यामुळे काही मंडळी कर्ज भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करत आहेत.
मार्च अखेरीला आर्थिक वर्ष संपत असून, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. मार्च अखेर कर्ज हप्ता, व्याजाची परतफेडकरण्यासाठी बँकांसह फायनान्स कंपन्यांकडून तगादा लावला जातो. ३१ मार्चपर्यंत कर्ज हप्ता न भरल्यास असे कर्ज थकीतमध्ये मोडते. कर्जदाराला थकबाकीदारांमध्ये गणले गेल्यास…फेडू न शकणाऱ्या व्यक्तीला पुन्हा कर्ज मिळविण्यातही अडचणी येतात. त्यामुळे कर्जदारांकडूनही हप्ता भरण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. किमान व्याज तरी कमी होईल, या अपेक्षेने प्रयत्न सुरू आहेत.मार्चमध्ये मुलांची परीक्षा, लग्नसराई, यात्र जत्रांचा हंगाम यामुळे खर्च वाढल्याने कर्ज भर जिकरीचे होत आहे. बँकांमध्ये आवश्य कागदपत्रे व तारणाशिवाय कर्ज मिळत नाही त्यामुळे उसणवारी करून कर्जाची परतफेड करून चालु बाकीदार होण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत.