
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
भूम:-भूम तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पाथरूड जिल्हा परिषद गटातील संदीप महानवर दूधोडिकर या नवउद्योजकाने भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे पक्ष संघटनेला मोठे बळ मिळाले आहे.
अधिक माहिती की, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दिनांक 27 मार्च 2023 पासून सुरू आहे. प्रत्येक पक्षाने स्वतंत्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा पवित्रा सध्या तरी घेतला आहे. त्याप्रमाणे सर्वच्या सर्व ठिकाणी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक स्तरावर काम करणारी कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे सहभागी होतील यादृष्टीनेही पक्षीय नेते मंडळींची लगबग सुरू आहे.
अशातच पाथरूड जिल्हा परिषद सर्कल मधील नवयुवकांना व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारे जय मल्हार ट्रॅव्हल्सचे संचालक संदीप महानवर दूधोडिकर यांनी मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील भाजपचे संघटन बळ वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, माजी प.स. उपसभापती काकासाहेब चव्हाण, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप महानवर दुधोडिकर यांना प्रवेश दिला आहे..
यावेळी भूमचे माजी नगरसेवक रोहन जाधव, तालूका सरचिटणीस संतोष सुपेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, जनसेवा बँकेचे संचालक अंगद मुरूमकर, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, पत्रकार समाधान बोराडे, शहराध्यक्ष शंकर खामकर, युवा मोर्चा सरचिटणीस मुकुंद वाघमारे, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख शांतीराज बोराडे, संतोष औताडे,संतोष खंडागळे, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण भोरे, कृष्णा पाचंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थिती होती.