
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
पन्हाळा शहरामध्ये “स्वच्छ सर्वेक्षण -2023” आणि “माझी वसुंधरा 3.0” अभियानाची अंमलबजावणी सुरू असून या अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पन्हाळा यांच्या सामाजिक बांधिलकी (CSR) फंडातून नगापरिषदेस डस्टबिन आणि मोबाईल टॉयलेट मिळाले असून डस्टबिनचे वाटप आणि तीन दरवाजा परिसरात बसवण्यात आलेले मोबाईल टॉयलेट लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनाकुमार माळी त्यांनी नागरिकांना घरातील कचरा वर्गीकृत करूनच नगरपरिषदेच्या घंटागाडी द्यावा तसेच स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये उच्चतम कामगिरी नगरपरिषदेस सहकार्य करावे. जसे चार-पाच वर्षात महाराष्ट्रात देशात पन्हाळ्याचे नाव झाले आहे.तेच कायम ठेवावे असे आवाहन केले..
यावेळी युनियन बँक टी व्ही रामानंद, उपमहाप्रबंधक यांनी पन्हाळा शहर हे खूप स्वच्छ आणि सुंदर असून नगरपरिषदेस असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल, माजी उपनगरध्यक्ष रवींद्र धडेल,पन्हाळा शाखा कर्तव्यदक्ष अधिकारी सो, पूजा रोडे नगरपरिषद अधिकारी तसेच बँक अधिकारी व कर्मचारी व पन्हाळा गडावर चे नागरिक उपस्थित होते.