दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : शासकीय गुत्तेदार एम. पी. पवार. यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी एडवोकेट रिमा काळे खरात यांनी एका पत्रकार परिषदेत येते केली.
पवार यांना कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक तणाव नव्हता. मात्र जालना नगरपालिकेचा ताण त्यांना असह्य झाला होता. पालिकेचे बँक खाते होल्ड केले गेले. पालिकेतील लाचखोराची वाढलेली टक्केवारी, बिल देताना पालिकेने प्राप्तिकर, जीएसटी कराची रक्कम कपात केलेली असताना पालिकेतील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर व जीएसटी च्या रकमा त्या खात्यात जमा न केल्यावरून पुन्हा त्याच विभागाच्या पवार यांना आलेल्या नोटीसा, गॅरंटीची नऊ टक्के रक्कम सहा महिन्याची तीन वर्षासाठी पालिकेने अडवून ठेवणे त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रचंड ताण आला होता .
पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध इंचलकरची येथे एका व्यक्तीस आत्महत्या जबाबदार असल्याबाबत पुन्हा दाखल आहे त्यामुळे एम. पी. पवार यांच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काळे यांनी केले आहे.