दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल
( सुनिल पाटील )
म्हसावद – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या शहादा येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी येथे कामगार व व घर कुटुंबियांसाठी नेत्र तपासणी मोफत शिबीर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक आर डी पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माधव पाटील कामगार अधिकारी अमोल पाटील कमलताई पाटील जिल्हा परिषद सदस्य कांचन पाटील उपस्थित होते शिबिरात डॉक्टर श्याम सूर्यवंशी व डॉक्टर शहाबुद्दीन पिंजारी यांनी कामगारांची नेत्र तपासणी केली सहाय्यक केंद्र संचालक अभिजीत पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले रवींद्र माने यांनी आभार मानले शिबिरात नंदुरबार येथील कांताबाई शहा नेत्रालय व लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीचे सहकार्य लाभले