
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / शिराढोण :- कंधार तालुक्यातील शिराढोण येथील गीतमोह सांस्कृतिक कला मंच यांच्याकडून
सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा
माहिती अधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत अनुसूचित, जमाती ऊप योजनाची माहिती मुखेड तालुक्यातील गावे चांडोळा,बिल्लाळी,अक्करगा व बेरळी या गावात जाऊन” गीतमोह सांस्कृतिक कलामंच शिराढोण ता.कंधार येथील “शाहिर बापुराव जमदाड़े “आणि सहकारी कलावंत यानी अनुसूचित जाती ऊप योजना रमाई आवास योजना,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,कर्मविर दादासाहेब सबलिकरन योजना,भारत सरकर शिष्यवृती,राजर्शी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व शिष्यवृत्ती,कन्यादान,मोटार वाहन प्रशिक्षण,अत्याचारास बळी ठरणा-या कटूबांना अर्थ सहाय ,गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविने,व वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार इ.लोककल्याणकरी योजणेची माहिती कलामंच द्वारे देण्यात आली त्यात सहभागी कलावंत हर्मोनीयम विकास गायकवाड,तबला-संजय कांबळे,ढोलकी-सुरेश डाकोरे,बॅन्जो-प्रवीण सोनकांबळे,तूनतुने-महिपती गजभारे,झाज-सुंनील जोंधळे,कोरस-अहिंसक जमदाड़े,महाजन पटेकर व रिंग -दत्ता सोनकांबळे इ.कलावंतानी लोककलेतून जन जगृती केली वरिल सांस्कृतिक कार्यक्रमाला वरिल गावतील सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक , महिला,प्रतिष्ठित नागरिक इत्यादी
उपस्थित होते व गावकऱ्यांकडून या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.