दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – पंचायत समिती म्हसळा व म्हसळा तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2022-23 क्रीडा गौरव पुरस्काराचे वितरण न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा येथील सभागृहात म्हसळा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मा. संतोष दौड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना
” आदर्श क्रीडा शिक्षक ” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले या मंचावर प्राचार्य श्री प्रकाश हाके, डॉ मुबशीर जमादार, श्री कौचाली, श्री नितीन पाटील हे उपस्थित होते आदर्श खेळाडू घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, व त्यासाठी मेहनत घेणारे को . ए. सो हायस्कुल चे क्रीडा शिक्षक मा. देवराम होना डावखर यांना उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रात कार्य केल्याने 2022-2023 चा “आदर्श क्रीडा शिक्षक ” मा संतोष दौड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याच वेळी आदर्श रा.जि. प. शाळा खरसई येथील शिक्षक श्री जयसिंग बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगा या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन शाळेचे व म्हसळा तालुकाला सन्मान देण्याचे काम केले. श्री जयसिंग बेटकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी मुळे 2022- 2023 आदर्श क्रिडा शिक्षक या पुरस्काराने मा गटशिक्षण अधिकारी मा संतोष दौड यांनी सन्मानीत केले.
न्यू इंग्लिश स्कुल पाभरे येथील क्रीडा शिक्षक श्री गिरीश अस्वले यांना हि या 2022 -2023 आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
म्हसळा तालुक्यातील आदर्श शिक्षक श्री नरेश सावंत यांना हि आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मा. गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले
या प्रसंगी क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक मा झाकीर हलसिंगे यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून व तालुका क्रीडा शिक्षक संघाचा एक आधार व मार्गदर्शन सतत असते ” असे श्री झाकीर हलसिंगी यांना
” आदर्श क्रीडा मार्गदर्शक ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे श्री संदीप कांबळेकर श्री रईस शेख, श्री बापू नारनवर, श्री प्रफुल पाटील, व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक हणमंत मोरे यांनी केले