दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तब्बल एक वर्षापासून लोहा पंचायत समितीचा कारभार प्रभारी च्या हातात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या प्रश्नांना बगल दिली जाते आहे तर कर्मचाऱ्यांचे लेट चे प्रमाण वाढले असून नागरिकांचे कामे करण्यासाठी चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नसल्याचे अनेक तक्रारी आहेत तसेच चिरीमिरीचीही प्रकार वाढले आहे याकडे वरिष्ठाचे जाणे पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चर्चेला उद्यान आले आहे. प्रभारी गट विकास अधिकारी हटाव पंचायत समिती बचाव असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
तब्बल दिड वर्षापासून लोहा पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नाही त्यामुळे अनेक शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत त्याचा फटका सामान्य नागरिकांना पडत आहे शासन शेतकऱ्यांसाठी शेतमजुरासाठी नवनवीन योजना आखात आहे पण त्याची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे व तर काही विभागाचे काम तर मला पहा फुले वहा सारखे झाले आहे कर्मचाऱ्यांचे लेटचे प्रमाण आणि चिरीमरी घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याची तक्रारी अनेक नागरिक करत आहेत पण त्यांना कोणीच वाचा फोडला जात नाही.
मनरेगा योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे . चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याचे अनेक तक्रारी आहेत सिंचन विहिरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याची बोलले जात आहे मार्च एंड च्या नावाखाली बिले काढण्यासाठी जास्त वेळ दिला जात आहे.आणी बोगस बिले करण्याचा सपाटा सुरू केला असल्याची चर्चा होत आहे
सध्या सिंचन विहिरीचे व मनरेगा योजना व घरकूल काही विविध कामाच्या बिले काढण्याची मोहीम सध्या सुरू आहे यावर वरिष्ठ दुर्लक्ष करून प्रभारी गटविकास अधिकाराला पाठबळ दिले जात असल्याचेही बोलले जाते एकीकडे नांदेड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कापल्या कामाची चुणूक दाखवत सर्व जिल्हाभर चांगले कामे करा म्हणून कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत पण त्यांच्या च कार्यालय तील काही कर्मचारी याला बगल देत सर्रास नागरिकाची लूट करत असल्याची बोलले जाते याकडे वरिष्ठ ने लक्ष देऊन त्वरित लोहा पंचायत समिती ला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
एक गटविकास अधिकारी यांना एखादी काम चांगले असता त्याला कायद्याच्या आडफाटा आणून ते काम करत नसल्याचेही अनेक तक्रारी सरपंचाच्या तक्रारी आहेत यावर वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.