दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) : तालुक्यातील धाडी येथील बचत गटाच्या १५ महिलांना वरूड येथील फिन केअर बँकेच्या नावावर दुसऱ्याच दिवशी १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी
प्रत्येकी महिला ४३५० रुपये प्रमाणे ६५ हजार रुपये गैरमार्गाने वसुली करत पोबारा केल्याप्रकरणीचे वृत्त दै.चालू वार्ता या वृत्तपत्रातून जयदादा बेलखेडे आणि
हर्षलताताई बेलखेडे दांपत्याच्या वाचनात आले आणि थेट त्यांनी संपर्कातील कार्यकर्त्यांना विचारपूस करत धाडी गाव गाठले आणि बचत गटाच्या महिलांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करून बचत गटाच्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले तत्पूर्वी बेलखेडे दाम्पत्यानी धाडी गावात प्रवेशित होताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचा पत्ता विचारत दोन्ही ठिकाणी वंदन करत एक नवा पायंडा पाडला आहे त्यानंतर बचत गटाच्या महिलांची भेट घेऊन चर्चा केली