
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : अंबड शहरातील पाचोड रोड परिसरात कौटुंबिक वादातून जावयाने मित्रांसह दुचाकीवर सासरवाडीत येऊन सासऱ्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेने पंडित भानुदास काळे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेने अंबड शहरासह परिसरात एकच खबळ उडाली. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंबड शहरातील पाचोड परिसरात राहणाऱ्या पंडित भानुदास काळे यांचे जवाई किशोर शिवदास पवार (रा. आडूळ, ता. पैठण, हल्ली मुक्काम पाचोड) यांच्यासोबत कौटुंबिक कलहातून अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. या वादातून जवाई किशोर पवार याने आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या मित्रांसह सासरवाडीत आले.
दोन गोळ्या लागल्याने मृत्यू
सासरे पंडित काळे यांच्यावर जवळ असलेल्या गावठी कट्टयातून गोळीबार केला. यात पंडित काळे यांना दोन गोळ्या लागल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामाना करत काळे यांचा मृत्यदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी दाखल केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिलीय.