
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- रोखठोक वक्तृत्व,धारदार लेखणी आणि उत्तम भाषाशैली यांच्या जोरावर समाजातील सर्वसामान्य जनतेवर होणारे अन्याय,अत्याचार दूर करण्यासाठी प्रयत्न करत असलेले एका सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व ध्यान तज्ञ व समुपदेशक तसेच आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांना Forever Star India कडून ‘द रिअल सुपर हिरो अवॉर्ड २०२१’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यात्मिक,शैक्षणिक,आरोग्य तसेच पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असताना समाजामध्ये सर्वसामान्य जनतेवर होणारे अन्याय,अत्याचार पाहवत नाहीत म्हणून छत्रपती शिवराय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार अनुसरून आपले मानवाधिकार फाउंडेशनची स्थापना केली.समाजामध्ये सर्वसामान्य सोबत आणि धनाढ्य लोकांविरूद्ध आवाज उठवताना भरपूर अडचणी आल्या परंतु कोणत्याही प्रकाराला न जुमानता आपली चळवळ चालू ठेवली आणि महाराष्ट्र पिंजून आपले सहकारी तयार केले.काही सहकारी यांनी साथ सोडली, विरोध केला तरी आपण मागे हटायचे नाही अशी जिद्द मनात बाळगून कार्य चालू ठेवले आणि आज त्याचे रूपांतर एका मोठ्या संघटनेत झाले.या संघटनेतील सहकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व सामान्य जनतेला शैक्षणिक,वैद्यकीय तसेच इतर कोणत्याही क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर अभ्यास करून मार्गदर्शन व सहकार्य करण्यात यशस्वी होत आहेत. त्याचप्रमाणे ध्यान व योग आणि प्राणायामचा गाढ अभ्यास असल्याने अंधश्रद्धा असलेल्या भागात तेथे अंधश्रद्धा दूर होण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.तसेच तरुणांना आणि विद्यार्थ्यांना रोजगार कसा निर्माण करावा व भविष्य कसे घडवावे यासंदर्भात विशेष मार्गदर्शन करून ते उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग ने मानसशास्त्र विषयातील मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते.तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन Forever Star India ने ‘द रिअल सुपर हिरो अवॉर्ड २०२१’ देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात असून हा पुरस्कार म्हणजे आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या सर्व सहकारी यांचा हा सन्मान आहे असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रत्येकाने छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार समोर ठेऊन कार्य केल्यास प्रोत्साहन मिळेल आणि कार्याला यश मिळेल. कार्य करताना विश्वास आणि इमानदारी ठेवणे जास्त आवश्यक आहे. हा पुरस्कार म्हणजे मला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा सन्मानच आहे. म्हणून हा पुरस्कार आपले मानवाधिकार फाउंडेशन ला समर्पित करत आहे.- डॉ.दिपेश पष्टे