
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील
पेवा येथिल श्री. जनार्धन महाराज संस्थानच्या अध्यक्षाच्या घरातील चोरीमधिल जप्त केलेले 1,89,000/-रुपये व एक सोन्याची चैन 50,000/- रुपये किमतीची असा एकुण 2.39,000/- रुपये असा गुन्हयात आरोपीकडुन जप्त केलेला मुद्देमाल मंठा पोलीसांनी पेवा संस्थानचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या ताब्यात दिल्याने पेवा गावातील ग्रामस्थांनी पोलीसांचे आभार मानुन स्वागत केले.
दि. 14/02/2023 रोजी श्री. जनार्धन महाराज संस्थानचे अध्यक्ष भास्कर गंगाधर सोनटक्के यांनी पोलीस ठाणे मंठा येथे येवून तक्रार दिली होती कि, दि. 10/02/2023 रोजी यात्रा संपल्यानंतर श्री. जनार्धन स्वामी ट्रस्टचे पावतीचे, वर्गणीचे व दान पेटीतील जमा झालेले पैसे मोजुन त्यांनी पेवा येथे घरी जावुन घरातील कपाटामध्ये ठेवले होते व त्यांच्या बहिणीची तब्येत खराब असल्याने ते व त्यांची पत्नी असे घराला कुलुप लावुन गावाला गेले. व दि. 13/02/2023 रोजी पुन्हा घरी येवुन कपातील पैसे चेक केले असता घरातील नगदी 1,89,000/- रुपये व एक तोळ्याची सोन्याची चैन 50,000/- रुपये किमतीची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन पोलीस ठाणे मंठा येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बलभिम राऊत व पोना / शाम गायके यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन सखोल तपास केला. त्यानंतर सदरची चोरी हि पेवा गावातील
गजनान ओंकारअप्पा सोनटक्के याने केली आहे असे तपासात निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडुन गुन्ह्याच्या तासात चोरीस गेलेला मुद्देमाल नगदी 1,89000/-रुपये व एक सोन्याची चैन 50,000/- रुपये किमतीची असा एकुण 239000/- रुपये असा गुन्हयात आरोपीकडुन जप्त केलेला मुद्देमाल मंठा पोलीसांनी पेवा येथिल श्री. जनार्धन महाराज संस्थानच्या अध्यक्ष व पादाधिका-यांच्या ताब्यात दिल्याने पेवा गावातील ग्रामस्थांनी पोलीसांचे आभार मानुन स्वागत केले
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जालना मा. श्री. डॉ. अक्षय शिंदे साहेब, मा. राहुल खाडे साहेब अप्पर पोलीस अधिक्षक जालना, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजु मोरे साहेब, मा. श्री. पोनि. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभिम राऊत, आसमान शिंदे, पोलीस अंमलदार विठ्ठल मेखले, रखमाजी मुंडे, शाम गायके, कोलगणे, दिपक आहे संतोष बनकर, सविता फुलमाळी, आसाराम मदने, यांचे सत्कार करुन व पेढे वाटुन आभार मानल.