
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनीधी नवनाथ यादव
भुम :- ईट येथे २६/ ११ तील सर्व शूर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा केला.भारतीय संविधानाचे शिल्पकार, परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उद्गाते, उत्कृष्ट संसदपटू, शिस्तप्रिय प्रशासक, कायदेतज्ज्ञ, पत्रकार, ग्रंथकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात केले.यावेळी कॉम्रेड अशोक माने ,अक्षय काळखैरे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच प्रवीण भैया देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब थोरात,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष हनुमंत हुंबे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे समीर भाई,आँल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने, AISF ईट शाखा उपाध्यक्ष क्रांतिसिंह राऊत,मा अध्यक्ष बाळासाहेब हुंबे,सचिव मयूर पवार,भिम नगर जयंती चे अध्यक्ष अक्षय काळखैरे तसेच ईट शाखेचे पदाधिकारी व तसेच संघटनेचे कार्यकर्ते,नागरीक उपस्थित होते.कार्यक्रर्माचे सूत्रसंचालन व समारोप कॉम्रेड अशोक माने यांनी केला.