
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठीचा दिवस चांगला ठरला. बुधवारी, बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.
त्यामुळे बाजार मंगळवारी वधारला.काल दिवसभरातील शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 346 अंकांच्या तेजीसह 57,960 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 129 अंकांच्या तेजीसह 17,080 अंकांवर स्थिरावला.
कालच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू अशा सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. फक्त ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील स्टॉकसमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील फक्त 6 कंपन्यांचे शेअर दर घसरणीसह बंद झाले. तर, 44 कंपन्यांचे शेअर दर वधारले. सेन्सेक्स 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. तर, फक्त 4 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
कालच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 254.77 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मंगळवारी मार्केट कॅप 252 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.77 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
तेजीसह बाजाराची सुरुवात
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनं 57800 चा टप्पा ओलांडला. याशिवाय निफ्टीनंही बाजार उघडताच 17000 च्या वरची पातळी गाठली. आज, जवळपास सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये तेजी दिसून आली.