
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
WhatsApp मागील अनेक दिवसांपासून युजर्ससाठी विविध फीचर्सवर काम करत आहे. आता WhatsApp आणखी एक नवं फीचर आणणार आहे. WhatsApp गेल्या काही दिवसांपासून सेंड मेसेज डिलीट करण्याची मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे.
WhatsApp वर पाठवलेले मेसेज रिसिव्हरच्या फोनमधून डिलीट करण्यासाठी Delete For Everyone हे फिचर देण्यात आले आहे. परंतु या फिचरच्या वापरला कंपनीने वेळ मर्यादा दिली आहे.
सध्या १ तास, ८ मिनिटं आणि १६ सेकंदाच्या आत पाठवलेला मेसेज रिसिव्हरच्या फोनमधून डिलीट करता येतो. परंतु लवकरच ही मर्यादा वाढवण्यात येईल. अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.
सध्या असलेली सुमारे एक तासाची वेळ वाढवण्यासाठी कंपनी काम करत आहे. सध्या या अपडेटवर काम सुरु आहे आणि हे फिचर आता बीटा टेस्टरसाठी देखील उपलब्ध नाही.
व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची मर्यादा कायमची रद्द करणार असल्याची बातमी याआधी आली होती. परंतु आता ही मर्यादा ७ दिवसांपर्यंत वाढवण्यात येईल.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप Desktop beta 2.2147.4 वर मेसेज डिलीट करण्याच्या फीचरमध्ये एक नवीन अपडेट दिसला आहे. या बीटा अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवरून मेसेज डिलीट करण्याची वेळ १ तास, ८ मिनिटं, १६ सेकंदांवरून ७ दिवस आणि ८ मिनिटं करण्याची योजना आहे.
WABetaInfo ने या नव्या अपडेटचा एक स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. फीचर कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
•तसेच, WhatsApp व्हॉइस नोटसाठी प्लेबॅक स्पीड हे बटण आणत आहे. हे फीचर iOS वर व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये आलं आहे. सध्या ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटासाठीदेखील लाँच केलं जाईल, अशी अपेक्षा आहे.
*व्हॉट्सअॅपमध्ये आले ‘हे’ कमालचे टूल, वाचा सविस्तर*
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी खास टूल लाँच केले आहे. याच्या मदतीने यूजर्स कोणत्याही फोटोला स्टीकरमध्ये बदलू शकतात. हे फीचर सध्या वेब व्हर्जनसाठी उपलब्ध झाले आहे. लवकरच मोबाइल व्हर्जनसाठी देखील हे फीचर जारी करण्यात येणार आहे.
● याआधी कंपनीने यूजर्ससाठी म्यूट व्हिडिओ फीचर जारी केले होते. याद्वारे व्हिडिओच्या आवाजाला म्यूट करू शकता.
● ज्या यूजरला कस्टम स्टीकर पाठवायचे आहे, त्याची चॅट विंडो ओपन करा.
● त्यानंतर क्लिप आयकॉनवर टॅप करा.
आता तुम्हाला स्टीकरचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
● आता फोटो तुम्हाला पाहिजे तसा एडिट करा.
● यानंतर तुमच्या फोटोचा स्टीकर तयार होईल व या स्टिकला तुम्ही शेअर करू शकता.