दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशजी कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंग ठाकूर ,कार्याध्यक्ष मारोती शिकारे, पोलीस मित्र समिती चे नांदेड जिल्हाध्यक्ष सुनिल जोशी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत निवडीचे पत्र देऊन निवड झालेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या बैठकीमध्ये लोहा तालुका राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार बालाजी धनसरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या बैठकीमध्ये शहर, ग्रामीण, महिला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बुध्दे, सचिव पदी प्रेमानंद कांबळे, उपाध्यक्ष पदी राम पाटील शिरसागर ,कोषाध्यक्ष पदी शिवहार गालफाडे, कार्याध्यक्षपदी लहू श्रीमंगले,संघटक पदी मारोती कांबळे, रविकांत जोंधळे, शरद कापुरे ,हनमंत कंधारे ,सोपान जाधव, तुळशीराम लुंगारे, सुहास कुमार काकडे, यांची निवड करण्यात आली महिला कार्यकारणी मध्ये महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी कीर्तीमाला महाबळे, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी सौ.कावेरी मारोती तेलंग यांची सर्वांनी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू श्रीमंगले यांनी केले तर आभार शरदचंद्र कापरे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.