
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार ;- मौजे बोरी बु ता कंधार जि नांदेड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री.महादेवाची यात्रा व कुस्त्यांची प्रचंड दंगल आयोजित केली आहे.यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. दिनांक ०२/०४/२०२३ रोज रविवार रात्री श्री.महादेवाचे लग्न, दिनांक ०३/०४/२०२३ रोज सोमवार सकाळी आमली बारस त्यानिमित्ताने काठीकावडीचा कार्यक्रम तसेच रात्री ९ वाजता दारूगोळा उडवणे, रात्री ११ वाजता संगीत राजा हरिश्चंद्र या नाटकाचा कार्यक्रम, दिनांक ०४/०४/२०२३ रोज मंगळवार कुस्त्यांची प्रचंड दंगल आयोजित केली आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व व्यापारी तसेच कुस्तीपटू यांनी यात्रेत सहभाग घ्यावे असे पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी बोरी बु, वाखरड,वाखरडवाडी, कागणेवाडी, कळका, कळकावाडी, मंगनाळी, शेल्लाळी,टोकवाडी, नांवद्याचीवाडी, बोरी बु.गावकरी मंडळीं व महादेव देवस्थानचे अध्यक्ष खा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यात्रेत सहभागी होऊन सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.