दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी-
मंठा येथील सरस्वती नगर(छल्लांनी काॅलनी) येथे प्रभू श्रिराम मंदिरात गुढी उभारून आरती करण्यात आली .चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.
मंठा येथील सरस्वती नगर येथे बारा वर्षांपूर्वी श्रिराम मंदिराचे बांधकाम करून श्रिरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.दरवर्षी रामनवमी च्या दिवसी जन्माष्टमी साजरी करूण भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते दरवर्षी मंदिरावर गुढी उभारली जाते,या वर्षी श्रिराम मंदिरावर कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा चे उपसभापती राजेश मोरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली व महाआरती करूण भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी रंजीत बोराडे, आयोजक सुधाकर घुगे, गणेश राव साकरेकर गुरु,सुदाम राठोड सर,संतोष राव कुलकर्णी वायाळ सर प्रदीप कुलकर्णी परसराम टकले ,मदनराव ठोकरे ,पी राठोड ,बांडगे सर अवचार सर ,शिवाजीराव देशमुख ,अनिल माकोडे यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते