
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/केज— केज मतदारसंघातील सांगवी( सारणी) येथे आज दिव्यांगासाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीरामध्ये तपासणी बरोबरच दिव्यांगांना जयपूर फुट, कॅलिपर, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कुबडी, वॉकींग स्टीक मोफत देण्यात येणार आहे. हे शिबीर आज व उद्या असे दोन दिवस चालणार असून या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन भगवान महावीर (विकलांग सहाय्यता समिती मुंबई), ईव फाऊंडेशन व श्री.संत भगवान बाबा सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. ३० व ३१ मार्च रोजी सकाळी ९ ते १ च्या दरम्यान सुरू असलेल्या शिबीरामध्ये भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीच्यावतीने जितेंद्र चौकसी स्मृती प्रित्यर्थ जयपुर फुट व कॅलिपरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या बरोबरच ईव फाऊंडेशनच्यावतीने तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र कुबडी,वॉकींग स्टीक मोफत देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम संत भगवान बाबा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असून दिव्यांगानी शिबीराला येतांना आधार कार्ड,अपंग प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावेत असे आवाहन संत भगवान बाबा सोशल फाऊंडेशन व सारणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमास उपस्थित होतो.व सर्व जनतेस श्री रामनवमीनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.आम्हाला बोलवून जो सन्मान केला त्याबद्दल सांगवी सारणी चे सरपंच संजय महाराज केदार व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार.
यावेळी मा.माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब मा.डॉ.नारायणजी व्यास साहेब,उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत साहेब,जिल्हाअध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,राजकिशोरजी मोदी,नंदू दादा मोराळे,बालाजी तांदळे,व्यंकटेश चामणार सर,दत्ता भाऊ धस,रमाकांत धस केदार,पत्रकार विशालजी साळुंके,पत्रकार उबाळे सर,शिवशाहीर खराटे व ईतर मान्यवर उपस्थित होते.