
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: दिनांक 30 मार्च 2023 रोजी देगलूर शहरात
श्रीराम जन्मोत्सव हिंदू एकता दिनानिमित्त देगलूर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी प्रभू श्रीराममाची भव्य अशी मूर्ती शोभा यात्रेमध्ये उजळून दिसत होती. लेझीम पथक वेगवेगळ्या वेशभूषा मधील विद्यार्थी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला होता. पोलीस प्रशासनाने पण कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवून शोभा यात्रेतील रामभक्तांचा उत्साह वाढवला . त्यावेळी शोभायात्रेत हजारोच्या संख्येने देगलूर व देगलूर तालुक्यातील रामभक्त उत्साहाने सामील झाले होते. तेव्हा देगलूर येथील आजी-माजी नगराध्यक्ष देगलूर शहरातील सर्व नगरसेवक सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने देगलूर व देगलूर तालुक्यातील रामभक्त शोभा यात्रेत उत्साहाने सामील झाले होते.