
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
पुणे- महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर सुवर्णकार समाजासाठीचे योगदान व वृत्तपत्र क्षेत्राच्या माध्यमातून कार्य परिचय असलेले मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांना नुकतेच नागपुर येथील कविवर्य सुरेशभट सभागृह येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सर्वशाखीय सोनार महोत्सव २०२३ मध्ये आदर्श सुवर्णरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यात स्थायिक असलेल्या ढेकळे यांचे सुवर्णकार समाज्यासाठीचे योगदान मोठे असून त्यासोबतच नागपुर येथुन प्रकाशित होणारे “सुवर्णालंकार” या मासिकात गेली बारा वर्षापासून ढेकळे यांनी अनेक विषयावर लेख लिहले आहेत त्यास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुवर्णालंकार मासिकाच्या यशात त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे. सुवर्णालंकारच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन मुख्य संपादक प्रकाश माथने तसेच संपादक पुरुषोत्तम कावळे यांचे हस्ते उत्तम समाजकार्य व मुक्त पत्रकारितेसाठी आत्माराम ढेकळे यांना आदर्श सुवर्णरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी ऋग्वेद टुडे न्युज चॕनेलचे संपादक दिनेश येवले यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातील सुवर्णकार समाज बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.