
भूम:-युवकांनी नोकरीच्या मागे न लागता इतरांना नोकरी देण्यासाठी व्यवसाय उद्योग उभारावे.यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा उद्योग आघाडीच्यावतीने सर्वतोपरी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल असे आश्वासन उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर यांनी बेरोजगार युवकांच्या बैठकीत बोलताना युवकांना दिले .
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आ.सुजितसिंह ठाकूर . माजी मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा उद्योग आघाडीच्या वतीने बेरोजगार युवकांसाठी एक दिवसीय मेळाव्याच्या स्वरूपात बैठक घेतली.यामध्ये तालुक्यातील बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान बँकांकडून जिल्हा उद्योग व्यवसाय मार्फत मुख्यमंत्री जिल्हा निर्मिती कार्यक्रम उद्योग संचालनालयाच्यावतीने बेरोजगार युवकांच्या आवडी निवडीप्रमाणे गरजेप्रमाणे शौक्षणिक पात्रते नुसार जो कोणता व्यवसाय करावयाचा आहे त्या व्यवसायाला अनुसरून सल्ला व आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी भाजप जिल्हा उद्योग आघाडी सतर्क राहिल असे आश्वासन बैठकित सुशांत भूमकर यांनी दिले.यावेळी जिल्हा उदयोग केंद्र प्रमुख जवळीकर,जिल्हा उदयोग आघाडी जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर व आ.राणा दादा यांचे स्वीय सहायक आवटे ,भाजप तालुका अध्यक्ष महादेव वडेकर,सरचिटणीस संतोष सुपेकर,तालुका युवा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे,तालुका युवा सरचिटणीस उत्कर्ष देशमुख,उदयोग आघाडी तालुका अध्यक्ष रमेश बगाडे,शहराध्यक्ष शंकर खामकर, युवा शहरध्यक्ष सुजित वेदपाठक,तालुका चिटणीस बाबासाहेब विर,मा.नगराध्यक्ष संभाजी साठे,कोषाध्यक्ष सचिन बारगजे, केशव वेदपाठक,अंकुश कुकडे,रामदास झोळ,राजगुरू कुकडे,सुधीर घोलप,ता. उपाध्यक्ष मधुकर अर्जुन उपस्थित होते.