
दैनिक चालु वार्ता म्हसळा-रायगड -अंगद कांबळे
म्हसळा – हिंदु ग्रामस्थ मंडळ आणि त्वेष्टा कासार समाज यांच्यासंयुक्त विद्यमाने म्हसळातील श्री राम मंदिरात श्री राम नवमी उत्सव मोठ्या आनंदी आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून श्री राम नवमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.रोहा येथील प्रसिद्ध कीर्तनकार सुषमा भावे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.किर्तनात म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटिल,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कूडेकर,प्रसाद पोतदार,भालचंद्र करडे,भालचंद्र दातार,सुनील उमरोठकर,बाबू बनकर,महेंद्र करडे,सुशील यादव, गौरव पोतदार,महादेव कदम,लहू तुरे,प्रतिक गोविलकर,सुजित बोरकर,हरिछंद्र गोविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.प्रभु श्री रामचंद्रांचे संपुर्ण जीवनावर सुषमा भावे यांनी अतिशय सुंदर असे किर्तन करून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.म्हसळा तालुक्यातील देवघर,रेवली येथील साईं मंदिरात भक्तिभावे उत्साहात श्री राम नवमी उत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.