
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अंबड – ज्ञानेश्वर साळुंके
धनगर पिंपरी येथे परंपरेने श्रीप्रभु रामचंद्र जन्मोत्सवाच्या वेळेला श्री रामजन्मोत्सव झाल्यने राममंदिरा येथे दुपारी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला व त्यां वेळेस ह भ प पाडूरग म उगले यांचा दुपारी यांचे किर्तन संपन्न झाले, यावेळी नगराध्यक्ष तथा भाजपा अनुसुचित जाती जिल्हाध्यक्ष मा.श्री देविदास कुचे यांनी उपस्थित राहुन उगले महाराज यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतला
यानंतर सर्व गावात पालखीची मिरवणूक व प्रदक्षिणा करण्यात आली यानंतर व प्रदक्षिणा वेळेला
गावातील व पंचक्रोशीतील भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थितत होती यानंतर रात्री 9ते11 वेळेला महाराष्ट्रातील कानाकोपरातील नामवंत व धनगर पिंपरी चे पुत्र ह भ प श्रीहरी महाराज रसाळ यांचे कीर्तन पार पडले
व दुसऱ्या दिवशी ह भ प रामेश्वर महाराज बेलगावकर यांच्या अमृतवाणीतून काल्याचे किर्तन होईल व नंतर सर्व पंचक्रोशीतील भजन मंडळींना महाप्रसाद होईल
सर्वभाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सर्व गावकरी मंडळींनी विनंती केली