
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- ग्रामीण भागातील जनता व कार्यकर्त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे व मायेच्या सावली प्रमाणे जपणारी, जनतेच्या चोविस तास सेवेमध्ये असणारी, गोरगरीब लोकांना अडी अडचणीच्या काळात,मदत करून धिर देणारी आधुनिक माता..सौ संगीताताई धोंडगे यांचा जन्म कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील
सौ छबूताई व श्री जयवंतराव पाटील मोरे यांच्या घरी
१जानेवारी १९८४रोजी मोठा गोतावळा असलेल्या एकत्र कुटुंबात झाला त्यांचे वडील पानशेवडी गावचे सरपंच म्हणून गेली २ दशक या पदावर काम केले असल्यामुळे संगीताताई यांना लहानपणापासूनच सामाजिक, राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले मोरे कुटुंबात सर्व भावा बहिणीची व सर्वांची लाडाची लेक म्हणून संगीताताई यांचे बालपण गेले लहानपणा पासून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा पिंड आहे. संगीताताई यांना दोन भाऊ एक बहीण असून ताईचे शिक्षण बी.ए.बी.एड पर्यंत झाले आहे…
वयाच्या २२ व्या वर्षी संगीताताई यांचा विवाह कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. शंकरअण्णा धोंडगे यांचे पुतणे श्री विजय बालाजी पाटील धोंडगे यांच्याबरोबर दिनांक २९ मार्च २०००रोजी झाला मोरे कुटुंबाची लाडकी लेक धोंडगे कुटुंबाची सून झाली आणि लग्न झाल्यानंतर पण सासरी राजकीय सामाजिक शेती क्षेत्रात धोंडगे कुटुंबाचे नाव मोठ्या प्रमाणात होते सासरी मोठ्या प्रमाणात शेतीची आवड असल्यामुळे पती श्री विजय पाटील धोंडगे यांनी शेतीत सतत नवीन प्रयोग राबवून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यावर त्यांचा भर राही असे नवीन नवीन प्रयोगमध्ये त्यांनी एक वेळा महाराष्ट्रामधील सर्वात जास्त आद्रक उत्पन्न घेऊन नावलौकिक मिळविले त्याच्या शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान वापर व प्रयोगाचे फळ म्हणून पुसद येथे माजी मंत्री श्री मनोहर नाईक यांच्या हस्ते सौ संगीताताई धोंडगे व विजय धोंडगे या उभयतांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले.
घरातच शेतकरी चळवळ व आंदोलनाचे धडे संगीताताई यांना मिळाले असल्यामुळे २००९ला श्री शंकरअण्णा धोंडगे आमदार म्हणून लोहा विधानसभेवर निवडून गेले आणि त्यामुळे श्री विजय पाटील धोंडगे व सौ संगीता ताई धोंडगे यांना राजकारण समाजकारण करण्यास अजून मोठ्या प्रमाणे संधी मिळाली अशातच २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत कौठा बारूळ सर्कल मधून सौ. संगीताताई विजय धोंडगे उभे राहून जनतेमध्ये केलेल्या कामामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून सौ संगीता ताई धोंडगे व विजय धोंडगे यांनी सर्कलमध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून जनतेशी आपुलकीचे नाते निर्माण केले आजही कौठा बारूळ सर्कलमधील प्रत्येक गावात “ताई” या नावाने त्या प्रसिद्ध आहेत संगीताताई धोंडगे व विजय धोंडगे यांनी आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला,मायमाऊल्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न हे जोडपे करत असते.सामाजिक कामात संगीताताई धोंडगे यांनी विजय पाटील धोंडगे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण ,शैक्षणिक साहित्य वाटप,वेळोवेळी गोरगरिबांना मदत करून आधार देण्याचा प्रयत्न केला २०१४/१५ मध्ये नदीला पूर आल्यामुळे कौठा गावात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले होते तेव्हा सौ संगीता ताई धोंडगे व विजय धोंडगे यांनी जोपर्यंत विस्कळीत जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत कौठा गावात राहून लोकांना योग्य ती मदत केली होती हे काम अजूनही लोक विसरत नाहीत. कोविडच्या काळात लॉकडाऊन मध्ये सौ संगीताताई व विजय धोंडगे यांनी मोठ्या प्रमाणात गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करून व इतर आवश्यक मदत केली आणि त्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जे काम केले त्यांचा पण सत्कार करून संगीताताई व विजय धोंडगे यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला एवढ्या मोठ्या धावपळीत सुद्धा संगीताताई धोंडगे यांनी कुटुंबाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळतात आज त्यांच्या पोटी दोन मुलं असून चि. सौरभ व मुलगी ऋतुजा त्यांच्याही शिक्षणाकडे वैयक्तिक लक्ष देऊन चि. सौरभ यांना पालघर येथे एमबीबीएस साठी मेडिकल शिक्षण घेण्यासाठी पाठवले व अशा कर्तुत्वान महिलेला जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार मिळाला याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा