दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :श्री स्वामी समर्थ मागासवर्गीय महीला सहकारी सूतगिरणी परिसर घोटी,सिन्नर रोड,गाव उभाडे,ज्योती स्ट्रक्चर टॉवर कंपनीच्या मागे इगतपुरी नाशिक येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी (नाना)घोलप हे संपूर्ण चर्मकार बांधवांना ८ व ९ एप्रिल ला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजाचे कार्य करणारे सक्रिय कार्यकर्ते,अधिकारी तसेच पदाधिकारी यांचे इगतपुरी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकर्ता प्रशिक्षण निवासी शिबिर आयोजित करण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण चर्मकार समाज ह्या शिबिरा करिता सज्ज झाला आहे आणि या दोन दिवसा शिबिराकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांनी केले आहे.
या शिबिराला मा.ना.पी.एल.पूनिया (माजी अध्यक्ष अनुसूचित जाती आयोग),मा.सोहनपालजी सुमनाक्षर (अध्यक्ष अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी),मा.सत्यनारायण जाटीया (माजी राज्यसभा खासदार),डॉ.विठ्ठलराव दांडगे (राष्ट्रीय अध्यक्ष रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशन),आणि मा.इंद्रेश गजभिये (राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.खा.सुशीलकुमार शिंदे,मा.खा.आनंदरावजी अडसूळ,मा.खा.सदाशिव लोखंडे,मा.खा.राहुल शेवाळे आदी सल्लागार खासदारांसमवेत या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंगत असलेले व्याख्याते निमंत्रित असणार आहेत.तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील,राज्याबाहेरील,भारतातील काही जन्मदिन सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी प्रशिक्षण घेण्यासाठी यावेळी येणार आहेत आणि प्रशिक्षित होऊन आपापल्या राज्यात तसेच जिल्ह्यात समाजकार्य करणार आहेत.