
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-बाजार समितिनामांकन दाखल करणाऱ्या तिसऱ्या दिवशी दहा बाजार समित्यांमध्ये ६१ नामांकन दाखल झाले आहेत. या तीन नामाकनाचा आकडा ८३ व पोहोचला आहे.नामांकन दाख करण्यासाठी शुक्रवार आ सोमवार हे दोनच दिवस शिल्ल सहीले आहेत. त्यामुळे या दो दिवसात मोठ्या प्रमाणात नामांकन दाखल होणार आहे. तिसऱ्याही दिवशी तिवसा व चांदूर रेल्वे या बाजार समितीमध्ये मात्र एकही नामांकन दाखल झाले नाही.
जिल्ह्यात अमरावती,अचलपूर,दर्यापूर,धारणी,अंजनगाव सुर्जी,मोर्शी,वरूड,चांदूरबाजार,धामणगाव,तिवसा,नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे या १२ बाजार समितीमध्ये २७ मार्चपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.पहिल्या दिवशी तीन बाजार समितीमध्ये चार तर दुसऱ्या दिवशी नऊ बाजार समितीमध्ये १८ नामांकन झाले होते.२९ मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर,अचलपूर,दर्यापूर,अंजनगाव सुर्जी,अमरावती,चांदूरबाजार,धामणगाव रेल्वे,मोर्शी,वरुड व धारणी या दहा बाजार समित्यांमध्ये ६१ नामांकन चारही मतदार संघात दाखल झाले आहेत. त्यामुळे नामांकनाची आकडेवारी ८३ वर चली आहे.२८ व ३० एप्रिल रोजी होवू घातलेल्या निवडणुकीकरिता आता सहकार नेते सक्रिय झालेले आहेत.३ एप्रिल रोजी नामांकनाचे अर्ज मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.