
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी चार अर्ज वैध ठरवले होते त्यामध्ये भाजपचे अमल महाडिक व शोमिका महादिक तसेच काँग्रेसकडून सत्यजित उर्फ बंटी पाटील व अपक्ष म्हणून शशिकांत खोत असे होते चंद्रकांत दादांनी पत्रकार परिषदेला माहिती देताना सांगितले होते की चांगला प्रस्ताव आल्यास महाराष्ट्राच्या सहाही जागा बिनविरोध करू तशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महाराष्ट्राची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली होती चार दिवसा अगोदर चंद्रकांत दादा यांनी पत्रकार परिषदेला माहिती देताना सांगितले होते त्याप्रमाणे आज महाडिक कुटुंबांना दिल्लीतून अर्ज माघारी मागणीसाठी फोन आला आहे काँग्रेस ने भाजपला चांगल्या प्रकारचा प्रस्ताव दिला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात विधानपरिषद बिनविरोध होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे अर्ज छाननी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाडिक व पाटील गटाच्या शाब्दिक चकमक उडाली होती आज त्याच्या विरुद्ध चित्र आपल्याला पहावयास मिळत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ . चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते . त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपच्या कमांडकडून करण्यात आली आहे.परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालादरम्यान,भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक झाली . या बैठकीत महाडिक यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेण्याचा निर्णय घेतला . कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती . गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले होते . जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडीक यांच्यात गेल्या काही वर्षापासून राजकीय वैर निर्माण झाले आहे दोघांत तुल्यबळ लढतीमुळे गेल्या काही दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती . आरोप – प्रत्यारोपाचा फैरी झडत होत्या.काटाजोड लढतीमुळे एकेक मतासाठी साम,दाम,दंड,भेद आदींचा वापर केला जात होता. परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला.बिनविरोधची यशस्वी झाल्याने सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीतील हवा निघून गेली काही सदस्य खूष तर काही सदस्य नाराज झाले आहेत .