
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षा पासून बौध्द नगर येथील प्रलंबीत असलेली पाईपलाईन दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पूर्ण करून येथील नव्वद घरांमध्ये नळ जोडणी दिली.आज याची टेस्टिंग घेण्यात आली.येथील नागरिकांना पूर्ण क्षमतेने तसेच अधिक दाबाने पाणी पूरवठा होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हाती धरलेले आणखीन एक काम पूर्ण करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे.या कामी सहकार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,तत्कालीन डिपीओ सतिश शिवणे,सहाय्यक आयुक्त कोकरे,
तत्कालीन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, न.प.प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी,प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद कुलकर्णी,पाणी पूरवठा अभियंता गणेश पूरी, लिपीक शेख मूसा यांचे आभार व्यक्त करत
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ‘हर घर जल’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला प्रयत्न करता आले याचे समाधान असल्याची प्रतिक्रीया युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.